तारदाळ येथील प्रकार
इचलकरंजी / प्रतिनिधी
शहरालगतच्या तारदाळ येथील जावायाची वाडी मधील एका शाळकरी विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सांयकाळी उघडकीस आली. स्वागत सुखदेव पोवार (वय १६) असे त्यांचे नाव आहे. यांची नोंद पोलिसात झाली आहे.
पोलिसांच्याकडून समजलेली माहिती अशी, मृत स्वागत पोवार हा गावातील एका हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत आहे. त्याने राहत्या घरी कोणीही नाही. यांची संधी साधून घराच्या लोखंडी अँगलला सुताच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सांयकाळी उघडकीस आला. त्याने आत्महत्या का केली, यांचे नेमके समजू शकले नाही. या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे.