डिचोली तालुक्यात विद्यार्थी पालकांमध्ये उत्साह
डिचोली/प्रतिनिधी
गोवा शालांत मंडळाच्या डिचोली परीक्षा केंद्र अंतर्गत गावागावातील हायस्कूलांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षा केंद्रांवर परिक्षेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला. कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर सर्व यी खबरदारी आणि उपाययोजना आखत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार परिक्षांना प्रारंभ झाला. परिक्षा उशीरा का होईना एकदाच्या सुरू झाल्याने विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्येही उत्साह निर्माण झाला होता.
डिचोली तालुक्मयातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी डिचोली व साखळी येथील केंद्रांवर दरवषी परिक्षा आयोजित केल्या जात होत्या. मात्र यावेळी कोवीडच्या संकटामुळे या परिक्षांवर अनिश्चिततेचे सावट होते. तरीही सरकारने या परिक्षा घेण्याचा निर्णय घेत गावागावातील हायस्कूलांमध्ये परिक्षा केंद्रांची स्थापना करीत परिक्षांचे आयोजन केले. डिचोली शांतादुर्गा हायस्कूल या केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या परिक्षांच्या वेळी डिचोलीचे माजी उपनगराध्यक्ष भगवान हरमलकर यांंनी विद्यार्थ्यांना मास्कचे वापट केले.
कासारपल येथे सर्व तयारीनिशी व उपायोजनेनुसार दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. या परीक्षा केंद्रात शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय – खोलपेवाडी साळमधील 47 विद्यार्थी, सरकारी माध्यमिक विद्यालय – साळमधील 13 विद्यार्थी तर सरकारी माध्यमिक विद्यालय – कासारपालमधील 20 विद्यार्थी एकूण मिळून या परीक्षा केंद्रात 80 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

पूर्व सूचनेनुसार प्रत्येक विद्यार्थी तोंडाला मास्क बांधूनच व समाज अंतर राखून विद्यालयात प्रवेश करीत होता. यावेळी आरोग्य खात्याचे दोन कर्मचारी थर्मलगन सह विद्यार्थ्यांचे तापमान बघत होते, तर एक कर्मचारी हात सॅनिटायझर करतात कि नाही यावर लक्ष ठेवून होते व नंतरच परीक्षा गृहात प्रवेश देत होते.पालकाना सुरक्षा भिंतीच्या गेटच्या आत प्रवेश बंदी होती. त्यासाठी पोलीस कर्मचारी तैनात होता.गेट जवळ पालकांनी गर्दी करू नये, गोंधळ घालू नये, समाज अंतर राखून राहावे याकडे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र नाईक हे लक्ष देऊन होते.
बोर्डाची परीक्षा होणे गरजेचे होते यात शंकाच नाही, गोवा ज्यावेळी ग्रीन झोन मध्ये होता त्यावेळी परीक्षा होणे सोईस्कर होते पण आता गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून कोण कसा असतो हे सांगणे कठीण पण सरकारने धोका पत्करून विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून परीक्षा येत आहे यात समाधान आहे आणि सरकारचे मी आभार मानतो असे कासारपाल हायस्कूल चे पालकशिक्षक संघाचे अध्यक्ष हरिश्®ांद्र नाईक यांनी विचार प्रकट केले.पालक रामचंद्र गवस म्हणाले की आज दहावीच्या मुलांची परीक्षा सुरू होत आहे, टाळेबंदी मुळे खूप दिवस ती राहिली , लवकरात झाली असती तर चांगले झाले असते पण आता ती होत आहे ही समाधानाची बाब आहे, शिवाजी शिवाजी राजे च्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका लेवेनिया लोबो या म्हणाल्यात की समाज अंतर राखून कोरोना विषाणू पासून दूर राहून आज ही परीक्षा होत आहे हे खरोखरच चांगली गोष्ट आहे आणि गोव्यातील दहावीच्या मुलांना मी हार्दिक शुभेच्छा देत आहे कि यांची ही परीक्षा सफल राहो. कासारपल परीक्षा केंद्राच्या प्रमुख सरकारी हायस्कूल क्सारपालच्या मुख्याध्यापिका सौ. रिटाया आवर्जून सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व तो प्रयत्न करीत आहेत.









