ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱया दहशतवाद्याच्या भावाला अटक करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जम्मू पोलिसांना यश आले आहे. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.
समीर डार असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचे नाव असून, तो पुलवामा हल्ल्यातील दहशतवादी आदिल डारचा भाऊ आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर डार याने गुरुवारी रात्री उशिरा 2 वाजता कठुआ जिह्यातील हीरानगर सेक्टरमधून तीने ते चार दहशतवाद्यांना ट्रकमध्ये बसविले होते. हे दहशतवादी राष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करून जम्मूमध्ये घुसले होते. हे सर्व ट्रकमध्ये मागच्याबाजुला लपलेले होते आणि काश्मीरला जात होते. हे दशतवादी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मोठा हल्ला घडविण्याच्या तयारीत होते.
शुक्रवारी पहाटे एका टोलनाक्यावर चेकींगदरम्यान संशय आल्याने पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता, त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ट्रकमधील तीन दहशतवादी मारले गेले. तर ट्रक ड्रायव्हरला अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5 रायफल, आरडीएक्स आणि बुलेटप्रूफ जॅकेट जप्त करण्यात आली आहेत.









