ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
घुसखोरी आणि हल्ल्यांसाठी दहशतवादी संघटनांनी चिनी ड्रोनला आपले मुख्य शस्त्र बनवले आहे. यापूर्वी दहशतवाद्यांकडून अंमली पदार्थ पुरवण्यासाठी केल्या जाणाऱ्या ड्रोनचा वापर आता शस्त्रास्त्रे पुरवण्यासाठी आणि हल्ल्यांसाठी केला जात आहे. दहशतवाद्यांच्या या नव्या शस्त्रामागे चीनचा कट आहे. ज्यामुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर ड्रोन मिळाले. आता चिनी सैनिक पाकिस्तानी लष्कराला आणि दहशतवादी संघटनांना ड्रोनच्या वापराबाबत ट्रेनिंग देत असल्याचे समोर आले आहे. बीएसएफकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली.
दहशतवादी संघटनांचा योग्य वापर करण्यासाठी पाकिस्तानी लष्कर पुन्हा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. जम्मूतील हवाई दल स्थानकावर झालेल्या हल्ल्यावरून दहशतवादी कटाची नेमकी व्याप्ती काय आहे? याचा अंदाज येतो. पाकिस्तानात बसलेल्या लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी ड्रोनने हल्ला करून ड्रोन पुन्हा पाकिस्तानला बोलावले होते.