जिह्याभरातून एकही परवान्यासाठी अर्ज नाही : राज्यात 85 बांधकाम व्यावसायिकांना नोंदणी परवाना
प्रतिनिधी / रत्नागिरी
राज्याच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मालमत्ता खरेदी-विक्रीला चालना देण्यासाठी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालयांत गर्दी होवू नये म्हणून बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी केंद्र सुरु करण्याचे परवाने देण्यात येत आहेत़ मात्र रत्नागिरी जिह्यामधील एकाही बांधकाम व्यावसायिकांनी यासाठी अर्ज केला नसल्याची माहीती सह जिल्हा निबंधक वाय़ ब़ी जंगम यांनी दिल़ी या दस्त नेंदणी केंद्रासाठी असलेली 500 सदनिकांचा गृहप्रकल्प हवा ही अट रद्ददेखील करण्यात आली आहे. तरी देखील जिह्यातील बांधकाम व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत़े
शासनाच्या या योजनेमुळे नागरीकांना मालमत्ता खरेदीची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही. बांधकाम व्यावसायिकांच्याच कार्यालयामध्ये दस्त नोंदणीची प्रक्रिया करण्यात येणार आह़े नागरीकांना दस्त नोंदणी करणे अधिक सुलभ व्हावे आणि विक्री करारनाम्याच्या नोंदणीसाठी बांधकाम व्यावसायिकांकडून ई-रजिस्ट्रेशन सुविधेचा वापर वाढवून मालमत्ता खरेदी-विक्रीला गती देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही योजना सुरु केल़ी बांधकाम व्यावसायिकांना यापूर्वी दस्त नोंदणी केंद्र सुरु करण्याचे परवाने दिले होत़े मात्र, यासाठी प्रथम करारनाम्याच्या नोंदणीसाठी ई-रजिस्ट्रर प्रणाली अंतर्गत 500 दस्तांची नोंद करण्याचे बंधन होत़े त्यामुळे मोठा गृहप्रकल्प असलेल्या बांधकाम व्यावसायिकांनाच या योजनेचा लाभ होत होत़ा ही बाब लक्षात घेवून हे बंधन उठवण्यात आल़े त्यामुळे कोणत्याही बांधकाम व्यावसायिकांना दस्त नोंदणी केंद्रासाठी परवाने दिले जाणार आह़े
अशी आहे प्रक्रिया………….
बांधकाम व्यावसायिकाकडे असलेल्या केंद्रामध्ये ऑनलाईन दस्त नोंदणी करण्यात आल्यानंतर संबधित माहीती दुय्यम निबंधक कार्यालयाकडे पाठवण्यात येत़े निबंधकाकडून कागदपत्रांची छाननी केल्यानंतर मंजुरी देण्यात येत़े बांधकाम व्यावसायिक आणि दुय्यम निबंधक कार्यालय यांच्यामधील ही प्रक्रिया असल्याने नागरीकांसाठी दस्त नोंदणी सोपी झाली आह़े









