प्रतिनिधी/ बेळगाव
भगवदगीतेच्या तत्वावर जितक्या टीका झाल्या, तितक्या टीका इतर कोणत्याही ग्रंथावर झाल्या नाहीत. या भगवदगीतेमध्ये 24 अवतार आहेत. त्यामध्ये दशावतार आहे, जो मूळ परमार्थ आहे. सर्व धर्मांची मूळ तत्वे एकच आहेत. त्यानंतर निर्माण झालेले अनेक संप्रदाय आहेत, असे विचार नागेशशास्त्राr हेर्लेकर गुरुजी यांनी व्यक्त केले.
शहापूर येथील सरस्वती वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या वसंत व्याख्यानमालेत संस्कारवर्ग ‘भगवान श्रीकृष्ण’ या विषयावर ते बोलत होते. प्रारंभी स्नेहा सांगलीकर व पूजा नातू यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. उपाध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार यांनी करुणाष्टक सादर केले. अध्यक्षा मीना खानोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख वक्त्यांचा सत्कार करण्यात आला. याबरोबर सुनीता देशपांडे यांचा देखील सत्कार झाला.
नागेशशास्त्राr हेर्लेकर गुरुजी पुढे म्हणाले, अहिंसा, सत्य, ब्रह्मचरित्र यांना यमनियम म्हणतात. याच्यावर ज्ञानेश्वरांनी फार विचार केला. ज्याच्यामध्ये अहिंसा भिनली तो चालताना देखील अहिंसेचा नियम पाळतो आणि हा नियम पाळतो त्याच्या वाटेला वैरत्व देखील येत नाही, असे त्यांनी सांगितले.
सूत्रसंचालन व आभार अरुणा कुलकर्णी यांनी मानले.









