प्रतिनिधी / इचलकरंजी
आपलीच दहशत निर्माण व्हावी, याकरीता दोघा जणांनी एका युवकाला दगडाने बेदम मारहाण करुन गंभीर जखमी केले. प्रमोद बाळू भिसे ( वय २४ , रा . मरगुबाई मंदिराच्या समोर,जवाहरनगर, इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी अजित सलगर, यासिन हटेली( पुर्ण नाव पत्ता माहित नाही) या दोघांविरोधी शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मीळालेली माहिती अशी, संशयीत आरोपी अजित सलगर, यासीन हटेली या दोघांनी परिसरात आपलीच दहशत निर्माण व्हावी, याकरीता जखमी प्रमोद भिसेला विनाकारण शिवीगाळ करीत, त्यांच्या तोंडावर दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जखमीस नातेवाईकांनी उपचारासाठी आयजीएममध्ये दाखल केले आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री घडला आहे.









