टोकियो
दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी प्रकरणी चीनने हस्तक्षेप करणे थांबवावे. तिबेटी संस्कृती आणि इतिहासाच्या आधारावर दलाई लामा यांचा उत्तराधिकारी म्हणून कोणाची निवड करावी हे तिबेटी लोक ठरवतील, चीनला याचा अधिकार नसल्याचे जपानी बौद्ध संमेलनात म्हटले गेले आहे. तिबेटच्या धार्मिक आणि अध्यात्मिक विषयांवर चीनच्या निरंतर हस्तक्षेपावर या संमेलनात आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे.









