कोहीमा (नागालँड)
रविवारी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रॉसकंट्री चॅमिपयन्सशीप स्पर्धेत सेनादलाच्या दर्शन सिंगने पुरूष गटात तर रेल्वेच्या वर्षा देवीने महिला गटात विजेतेपद पटकाविले. ही क्रॉसकंट्री 10 कि. मी. पल्ल्यांची आयोजित केली होती.
दर्शन सिंग आणि वर्षा देवी या धावपटूंनी अलिकडेच झालेल्या दक्षिण आशियाई (सॅफ) क्रॉसकंट्री स्पर्धेत आपल्या देशांचे प्रतिनिधीत्व करताना विजेतीपदे मिळविली होती. सेनादलाच्या दर्शन सिंगला त्याच्याच संघातील राजेंद्रनाथ, दीपक सिंग रावत, दीपक सुहाग व माजी विजेता हजीलोल यांच्याकडून कडवा प्रतिकार मिळाला पण दर्शन सिंगने आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यांना 24 सेकंदानी मागे टाकत पुरूष विभागातील जेतेपद पटकाविले. महिलांच्या विभागात रेल्वेच्या 27 वर्षीय वर्षा देवीने प्रथम स्थान मिळविले असून तिने गुजराथच्या रिना पटेल आणि गेल्यावर्षीच्या विजेत्या सोनिकाला मागे टाकले.
महिलांच्या तसेच पुरूषांच्या 20 र्व्शांखालील वयोगटात झारखंडची आशाकिरण बर्ला व उत्तराखंडच्या आकाश पटेल यांनी विजेतेपद पटकाविले. या क्रॉस कंट्रीमध्ये विविध राज्यांचे धावपटे मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.









