सात महिन्यात सोन्याला सर्वात निच्चांकी दर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव अस्थिर होते. पण 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताच सोन्याच्या दर जवळपास 1,500 रुपयांनी खाली आहे. सोन्याच्या दरातील घसरणीमुळे खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या 7 महिन्यात सोन्याने कमालीचा निच्चांकी दर गाठला आहे. आता सोमवारी पुन्हा बाजार सुरू झाल्यानंतर सोन्याच्या दरांना झळाळी येते की सोन्याचे दर पुन्हा घसरतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
1 फेब्रुवारीनंतर सोन्याचे दर सतत घसरत आहेत. गेल्या 7 महिन्यांमध्ये सोन्याचे दर तब्बल 2,500 रुपयांनी घसरल्यामुळेही सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे. अर्थमंत्र्यांनी सोने आणि चांदीचे आयातदर 2.5 टक्क्मयांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच सोन्याच्या दरात घसरण झाली.
गेल्या काही महिन्यात सोन्याच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे सोन्यात गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. मात्र आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचे दर घसरल्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांचा ओढा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.









