नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्पने वाहन बाजारात बीएस 6 वर आधारीत हिरो ‘एक्स्ट्रीम 200एस’ ही गाडी नुकतीच दाखल केली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये हे सदरचे मॉडेल लाँच केल्याने ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळणार असल्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
या वाहनाची किमत 1.15 लाख रुपये असून याला एलइडी हेडलॅम्प आहेत. सदरची दुचाकी ही पहिल्यापेक्षा अधिक स्पोर्टींग लूकमध्ये आणली आहे. हिरोने यासंदर्भातील अधिकचा तपशिल आपल्या वेबसाईटवर सादर केला आहे.
सुविधा…
बीएस 6 200 सीसी एअर कुल्ड इंधन इंजेक्स्टशनसह इंजिन
8500 आरपीएमवर 17.5 बीएचपी पॉवरसह उपलब्ध
7 स्टेप ऍडजेस्टेबल मोनोशॉक सस्पेंशनची सोय
सेल्फी आणि वाहन नियंत्रण चॅनल एबीएस आणि 276 एमएम प्रंट डिस्क









