वार्ताहर /केपे
केपे येथील कुशावतीतीरी वसलेल्या श्नी दत्तात्रेय देवस्थान व श्नी हनुमंत देवस्थान देवस्थान या दोन्ही देवस्थानाच्या शिखर कलशचा पुर्नस्थापना आज दुपारी संपन्न झाला. कुशावतीतीरी श्नी दत्तजंयती उत्सावाला 10 डिसेबर रोजी पासून सुरू झाला असून त्याची सांगता 18 रोजी दत्तजयतीने होणार आहे.
दि. 12 व दि. 13 रोजी दोन्ही देवस्थानाचा शिखर कलश पुर्नस्थापना झाली असून 12 रोजी सकाळी 9 वा गणपती पूजन, प्रायश्चित घेणे, स्वस्तिपुण्यहवाचन, प्राकार शुद्धी, क्तुत्वकिवरण, ब्राम्हण पूजन, नव ग्रहदेवता स्थापना, ब्रम्हादिमंडळ स्थापना, मुख्य देवता स्थापना, दोन्ही देवता शिखर कलशाचे शुध्दीकरण, नवग्रह देवता व मुख्य देवता हवन, महाआरती, धार्मिक विर्धी स्ंापन्न झाल्या तर 13 रोजी ही धार्मिक विधी नुसार दोन्ही शिखर कलशाना तत्व चढवणे, शिखर कलशाचे पूजन, तत्व होम व दुपारी बारा वाजता दोन्ही देवस्थानाचा शिखर कलश पुर्नस्थापना करण्यात आल्या. पुर्णाहूती, आरत्या व इतर विरोधी शिबिकोत्सव व इतर विर्धी संपन्न झाल्या. यावेळी ग्रामस्था सोबत विविध मान्यवरांनी यावेळी उपस्थिती राहून देवताचा आर्शीवाद घेतला









