प्रतिनिधी / मडगाव

एखाद्या व्यक्तीला कितीही कठोर घटना बघितली तरी काही वाटत नाही किंवा त्या व्यक्तीला कोणताच फरक पडत नाही, अशा व्यक्तीला ‘पाषाणी हृदयाची व्यक्ती’ म्हणून बऱयाच वेळा आपण संबोधित करीत असतो. पण, प्रत्यक्षात माणसाचे हृदय हे पाषाणी किंवा दगडी असू शकते का? हा संशोधनाचा भाग असू शकतो. पण, माणसाचे हृदय जरी पाषाणी नसले तरी दगडासारखेच असू शकते हे गोमेकॉतील शवचिकित्सक डॉ. भरत श्रीकुमार यांना आढळून आले आहे. हा अत्यंत दुर्मिळ प्रकार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जुलै 2020 मध्ये मडगाव पालिकेच्या गार्डनमध्ये जवळपास 50 वर्षांच्या एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्याचे शवविच्छेदन डॉ. भरत श्रीकुमार यांनी केली होते. हृदय विच्छेदन करताना त्यांना अशी एक दुर्मीळ अवस्था आढळली जिथे हृदय हे दगडासारखे कठोर होते. हृदयाच्या डाव्या वेंट्रिकलमध्ये मोठय़ा प्रमाणावर अंतःस्रावीय कॅल्सिफिकेशन होते, ज्यामुळे प्रतिबंधात्मक कार्डियोमायोपॅथी होते. (हृदयाची अशी स्थिती ज्यामध्ये वेंट्रिकल्स पूर्ण भरून तडजोड केली जाते). हृदय इतके कठोर होते की, जणू एक दगडच.

डॉ. भरत श्रीकुमार यांनी गोवा मेडिकल कॉलेजच्या पॅथॉलॉजी विभागाच्या सहाय्याने हृदयाच्या या भागावर हिस्टोपॅथॉलॉजिकल अभ्यास करण्याचे सुचविले. त्यांनी या दुर्मिळ हृदयाची कल्पना आपल्या वरि÷ांना दिली. हृदयाची हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणी केली असता, कॅल्सिफिकेशनमुळे हृदय दगडासारखे कठोर झाल्याची पुष्टी मिळाली. (कॅल्शयिमचे प्रमाण जसे मूत्रपिंडातील दगडांमध्ये होते तसाच हा प्रकार होता) ही एक सामान्य वैद्यकीय समस्या मानली जात आहे. विशेषतः दक्षिण भारतातील करेळ सारख्या किनारपट्टी भागात असे प्रकार आढळून येतात. कॅल्सिफिकेशन फायब्रोसिसबरोबरच होते त्यामुळे असे घडते. गोव्यात सापडलेल्या अज्ञात व्यक्तीच्या हृदयात कमीतकमी फायब्रोसिससह खूप कॅल्सिफिकेशन होते. ही एक अवस्था वैद्यकीय क्षेत्रात क्वचितच आढळून येते.
‘ए हार्ट सेट इन स्टोन’ पुरस्कार
इंडियन ऍकडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिन ही देशभरातील फॉरेन्सिक डॉक्टरांची राष्ट्रीय संघटना आहे. दरवषी या संघटनेच्या वतीने भारताच्या विविध राज्यांत राष्ट्रीय परिषद आयोजित करतात. या वर्षासाठी, कोविड (साथीचा रोग) सर्व देशभर (14) महाविद्यालयीन साथीच्या निमित्ताने 23 ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत एसबीसी मेडिकल कॉलेज, कटक ओडिशा येथे ही राष्ट्रीय परिषद अंशतः शारीरिक तसेच व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित केली गेली. या परिषदेमध्ये सुमारे 700 प्रतिनिधी उपस्थित होते आणि सुमारे 250 हून अधिक वैज्ञानिक कागदपत्रे या परिषदेत सादर केली गेली.
या परिषदेत इतर विद्याशाखा सदस्यांसह गोवा मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन विभागातील ज्युनियर रेजिडंट कम द्वितीय वर्षाचे पीजी विद्यार्थी डॉक्टर डॉ. भरत श्रीकुमार यांनी या परिषदेत भाग घेतला होता आणि फॉरेंसिक शास्त्रीय केस स्टडी पेपर शीर्षक ‘ए हार्ट सेट इन स्टोन’ सादर केले होते. पीजी पेपर प्रेझेंटेशनच्या प्रकारात त्यांना प्रथम पुरस्कार मिळाला. या बक्षिसामुळेच त्यांना डॉ. मनमोहन रेड्डी स्मृतिचिन्ह आणि रु. 10,000 आणि स्वर्गीय जगमोहन शर्मा यांच्या रू. 50,000 फॉरेन्सिक स्पेशलिटीच्या वैज्ञानिक संशोधनासाठी आगामी फॉरेन्सिक डॉक्टरांना प्रोत्साहित करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी अकादमीने ही ट्रव्हल शिष्यवृत्ती सुरू केली आहे. ती प्राप्त झाली आहे.
या संशोधनासाठी डॉ. भरत श्रीकुमार यांना डॉ. शेरिल सुवारीस, डॉ. आंदे व्ही. फर्नांडिस आणि विभागातील इतर वरि÷ांचे सहकार्य लाभले. या वैज्ञानिक संशोधनाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
स्व. डॉ. जगमोहन शर्मा यांना ही खरी श्रद्धांजली ः घोडकिरेकर आयएएफएमचे सध्याचे मुख्यालय प्रभारी डॉ. मधू घोडकिरेकर म्हणाले, देशभरातील फॉरेन्सिक मेडिसीनमधील वैज्ञानिक संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी इंडियन ऍकडमी ऑफ फॉरेन्सिक मेडिसिनने, फॉरेन्सिक मेडिसिनमधील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना गेल्या दोन वर्षांपासून पेपर सादरीकरणासाठी स्व. डॉ. जगमोहन शर्मा यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय प्रवासी शिष्यवृत्ती सुरू केली आहे. गेल्या वषी हैदराबाद येथे झालेल्या याच परिषदेत डॉ. भरत श्रीकुमार यांनी बुडून मृत्यू येण्यासदंर्भात वैज्ञानिक पेपर सादरीकरण केले होते. त्याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले होते. त्यावेळी आपण, डॉ. भरत यांना सांगितले होते की, पुढच्या वषी गोव्याला प्रथम क्रमाकांचे बक्षीस मिळाले पाहिजे. कारण माजी प्राध्यापक आणि आमच्या विभागाचे प्रमुख डॉ. जगमोहन शर्मा यांच्या नावाच्या मागे हा पुरस्कार देण्यात आला आहे. ही शिष्यवृत्ती जिंकून, आमच्या पीजींना आमच्या माजी प्राध्यापक आणि एचओडीला खरी श्रद्धांजली ठरली आहे.








