प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव दक्षिण मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीची गुरुवारी स्थापना करण्यात आली. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीबरोबर म. ए. समितीला बळकटी देण्यासाठी या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी झालेल्या बैठकीत महिला आघाडीच्या नूतन पदाधिकाऱयांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी माजी नगरसेविका सुधा भातकांडे तर सरचिटणीसपदी वर्षा आजरेकर यांची निवड करण्यात आली.
यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस किरण गावडे म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समिती प्रत्येक घरात पोहोचविण्याबरोबर समितीला बळकटी देण्यासाठी महिला आघाडी काम करणार आहे. त्याबरोबरच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी ही आघाडी सातत्याने सक्रिय राहणार असल्याचे सांगितले.
महिला आघाडीच्या सरचिटणीस वर्षा आजरेकर म्हणाल्या, कर्नाटक शासनाचा दबाब झुगारून समितीला बळकटी व ताकद देण्यासाठी या महिला आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून महिलांना जागरुक करण्याबरोबर सीमाप्रश्नासाठी आघाडीवर राहणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विद्या अकनोजी, रेणुका पाटील, प्रभावती लाड, विजयलक्ष्मी बगडे, गीता शहापूरकर, मनीषा सर्पे, शमिका बेळगावकर, गायत्री मुचंडी, कुसुम खवरे, स्नेहल देसाई, मनीषा चव्हाण, लक्ष्मी भातकांडे, रूपाली भातकांडे, रूपाली हसबे, सुमन सैनुचे, पूजा भातकांडे, निकिता मनवाडकर, लता शहापूरकर, राजेश्री पावशे, विना मजुकर, भक्ती भातकांडे, अश्विनी भातकांडे, माधवी अष्टेकर, सुचित्रा भातकांडे, सुधा भातकांडे, रूपा नेसरकर, गीता हलगेकर यांच्यासह महिला सदस्या उपस्थित होत्या. प्रारंभी वर्षा आजरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.









