कोरियन कंपनी हुंडाई अन् ब्रिटिश कंपनीदरम्यान करार
वृत्तसंस्था / सोल
ब्रिटनच्या क्वीन एलिझाबेथ विमानवाहू नौकेसारखी दक्षिण कोरियाची नवी विमानवाहू नौका असणार आहे. कोरियाची कंपनी हुंडाई हेवी इंडस्टीने (एचएचआय) चालू आठवडय़ात ब्रिटिश डिफेन्स कॉन्ट्रक्टर बॅबकॉक इंटरनॅशनलसोबत करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही कंपन्या मिळून दक्षिण कोरियाच्या विमानवाहू नौकेकरता काम करणार आहेत.
दोन्ही कंपन्या मिळून विमानवाहू नौकेच्या नव्या तंत्रज्ञानावर काम करणार आहेत. नौकेच्या डिझाइनचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याचे हुंडाईने यापूर्वीच सांगितले आहे. ब्रिटिश कंपनी बॅबकॉकने ब्रिटिश नौदलासाठी क्वीन एलिझाबेथ विमानवाहू युद्धनौका दक्षिण कोरियाच्या बुसान शहरातच तयार केली होती. चालू आठवडय़ात कोरियाच्या नौदलाने एलिझाबेथ युद्धनौकेसोबत सागरी युद्धाभ्यास केला होता.
ब्रिटिश कंपनी दक्षिण कोरियाच्या नौदलाकरता सामग्रीचा पुरवठा करणारी आहे. 1975 पासून आतापर्यंत हुंडाईने 90 युद्धनौका आणि पाणबुडय़ांची निर्मिती केली आहे. दक्षिण कोरियाची पहिली गायडेड मिसाइल डिस्ट्रॉयर देखील हुंडाईनेच तयार केली होती. याचबरोबर कंपनीने नेक्स्ट जनरेशनची फ्रिगेटही तयार केली आहे.
विमानवाहू युद्धनौकेत काय असणार?
हेलिकॉप्टर्ससाठी लँडिंग क्षेत्र
ड्रोन ऑपरेटरसाठी स्वतंत्र क्षेत्र
अनमॅन्ड सरफेस व्हेईकल
अनमॅन्ड मिडगेट सबमरीन्स









