वृत्तसंस्था/ बँकॉक
दक्षिण कोरियाने 23 वर्षाखालील वयोगटाच्या एएफसी चषक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाने सौदी अरेबियाचा जादा वेळेच्या कालावधीत 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
या अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत गोलफलक कोरा होता. त्यानंतर पंचांनी दिलेल्या जादा कालावधीत दक्षिण कोरियाच्या जेऑग तेई वुकने 113 व्या मिनिटाला एकमेव आणि निर्णायक गोल केला. या जेतेपदामुळे दक्षिण कोरियाच्या फुटबॉल संघाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत नवव्यांदा आपले तिकीट आरक्षित केले आहे.









