वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अबु धाबीमध्ये सुरू असलेल्या पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेतील शनिवारच्या सामन्यात क्वेट्टा ग्लॅडियेटर्स संघाकडून खेळणारा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज डु प्लेसिस क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला.
क्वेट्टा ग्लॅडियेटर्स आणि पेशावर झल्मी यांच्यातील सामना सुरू असताना डु प्लेसिस क्षेत्ररक्षणावेळी सीमारेषेजवळ चेंडू अडविण्याच्या नादात आपल्याच संघातील मोहम्मद हसनेनला जोराची धडक दिली. त्यावेळी त्याच्या डोक्याला मार लागल्याने तो काही वेळ कोसळला होता. या घटनेनंतर डु प्लेसिसला तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. या दुखापतीमुळे तो या सामन्यात फलंदाजी करू शकला नाही. क्वेट्टा संघाला हा सामना 61 धावांनी गमवावा लागला.









