ऑनलाईन टीम
भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जात असून उभय संघांमध्ये 12 मार्चपासून 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी सुनील जोशी यांच्या निवड समितीने रविवारी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. संघाचे नेतृत्व कर्णधार विराट कोहलीकडेच देण्यात आली असून संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
टीम इंडियाच्या १५ सदस्यीय संघात हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांना संधी देण्यात आली आहे. रोहित शर्मा अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे त्याला विश्रांती देतानाच सलामीसाठी शिखर धवनला आणखी एक संधी देण्यात आली आहे.
भारतीय संघ
शिखर धवन, पृथ्वी शॉ, विराट कोहली, केएल राहुल, मनिष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, भूवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रित बुमराह, नवदीप सैनी, कुलदीप यादव, शुभमन गिल.
हे खेळाडू बाहेर…
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी एकदिवसीय संघातून न्यूझीलंडविरुद्ध संधी दिलेल्या काही खेळाडूंना वगळण्यात आले आहे. सलामीवीर मयंक अग्रवाल, अष्टपैलू शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, केदार जाधव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यांना वगळण्यात आले आहे