प्रतिनिधी / सातारा
दक्षता सप्ताह निमित्ताने भित्तीपत्रके चिटकवून जनजागृती लाच लुचपत विभागाकडून केली जात आहे. तसेच लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1064 संबंधाने व्हिजिटिंग कार्ड देखील आहेत.
या विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिंर्के यांची भ्रष्टाचार विरोधी जनजागृती व्हावी या दृष्टीने आकाशवाणी केंद्र सातारा या एफएम वृत्तवाहिनीवर मुलाखत झाली. त्या मुलाखतीचे प्रसारण दि. 31 रोजी सकाळी होणार आहे. ही मुलाखत सचिन प्रभुणे यांनी घेतली आहे.









