ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
बॉलीवुडमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. आमिर खान नंतर आता दंगल गर्ल फातिमा सना शेखला कोरोनाची लागण झाली आहे. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तिने स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.

फातिमा आपल्या इंस्टा पोस्टमध्ये म्हणाली की, माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सद्य स्थितीत मी सर्व खबरदारी आणि नियमांचे पालन करीत घरामध्येच क्वारंटाइन आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि प्रार्थनेसाठी मी सर्वांची आभारी आहे. सर्वांनीीआपली काळजी घ्यावी.
दरम्यान, फातिमा आपल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी नुकतीच राजस्थानमध्ये गेली होती. शूटिंग साठी अभिनेते अनिल कपूर देखील उपस्थित होते. या सिनेमा बाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही.
आतापर्यंत बॉलीवूड मधील अनेक कलाकारांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे संजय दत्त, सलमान खान, सैफ अली खान आदी कलाकारांनी कोरोनाची पहिली लस टोचून घेतली आहे.









