प्रतिनिधी/ बेळगाव
मजगाव येथे बुधवार दि. 19 रोजी पीक सर्वेक्षण कृषी खाते बेळगावतर्फे तांत्रिक व्यवस्थापक राजशेखर भट्ट यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱयांना आपल्या मोबाईलद्वारे कशी माहिती पाठवायची याबद्दल सविस्तर माहिती दिली.
दि. 24 ऑगस्टपर्यंत प्रत्येक शेतकऱयाने पीक माहिती मोबाईलद्वारे रयत समीक्षा-2020 ऍप हे आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या पिकांची माहिती द्यावी, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतात-चिखलात जाऊन त्यांनी दाखविले.
सदर ऍपमुळे पीकविमा अथवा नुकसान झाले असेल तर वेळोवेळी शेतकऱयांना या ऍपद्वारे माहिती पाठविण्यास सुलभ झाले आहे. घरी किंवा कार्यालयात बसून यापुढे सर्वेक्षण होणार नसल्याचे यावेळी उपस्थित शेतकऱयांना सांगितले.
रयत समीक्षा ऍप मराठीतही हवे
सदर मोबाईलमध्ये फक्त कन्नड भाषेत ऍप उपलब्ध असल्याने बेळगाव तालुक्मयात मराठी भाषिक शेतकरी अधिक संख्येने असल्याने सदर ऍप मराठीत उपलब्ध करून द्यावे, अशी यावेळी शेतकऱयांनी मागणी केली.
यावेळी नेमू बाबू पाटील, देवेंद्र भरमा बस्तवाड, ए. डी. काकतकर, मलसर्ज सनदी, मल्हारी मजुकर, मधू पुजारी, अजित जंबू पाटील, देवेंद्र पारीस बस्तवाड, नंदकुमार मजुकर, मधू देवाप्पा मजुकर आदी शेतकरी उपस्थित होते.









