प्राप्तिकर विभागाची माहिती – आर्थिक वर्ष 2020-21 मधील आकडेवारी
नवी दिल्ली –
आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये एकूण प्रत्यक्ष कर संकलन 9.45 लाख कोटी रुपयावर राहिले आहे. जे अर्थसंकल्पातील अंदाजानुसार पाच टक्क्यांनी अधिक राहिला आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) तचे अध्यक्ष पी.सी. मोदी यांनी शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पर्याप्त परतावा निश्चित केलेल्या आकडेवारीपेक्षा अधिकचे कर संकलन झाले असल्याची माहिती आहे.
आर्थिक वर्षादरम्यान निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन 4.57 लाख कोटी रुपये होते, ज्यामध्ये निव्वळ व्यक्तिगत प्राप्तिकर 4.71 लाख कोटी रुपयावर राहिला आहे. यासह 16,927 कोटी रुपयाची एसटीटी देवाणघेवाण राहिली आहे. या अगोदर हा प्रत्यक्ष कर संकलनाचा आकडा हा 9.05 लाख कोटी रुपयावर राहणार असल्याचे ध्येय निश्चित केले होते. यासह कर संकलनाच्या अंदाजानुसार पाच टक्क्यापेक्षा अधिक राहिला आहे. परंतु 2019-20 मध्ये हेच ध्येय 10 टक्क्यांनी कमी राहिल्याची नोंद केली आहे.









