नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या तिमाहीत थेट कर संकलनाने चांगली कामगिरी नोंदवली असल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत 112 टक्के इतकी थेट कर संकलनात वाढ झाली आहे. या कराच्या वाटय़ात कॉर्पोरेट टॅक्स, वैयक्तिक प्राप्तीकर आणि सेक्युरिटीज ट्रान्सझॅक्शन टॅक्सचा समावेश आहे. वित्त मंत्रालयानुसार सरासरी थेट कर संकलन 2.16 लाख कोटींवर पोहचले आहे. गेल्या 12 वर्षाच्या कालावधीत वैयक्तिक कर संकलनाने कॉर्पोरेट टॅक्स संकलनाला मागे टाकले असल्याचे सांगितले जाते.









