वार्ताहर / पाचगाव
रायगड कॉलनी परिसरातील रहिवाशांच्यावतीने थुंकीमुक्त अभियान राबविण्यास सुरुवात करण्यात आली. थुंकीमुक्त कोल्हापूर हे आपले स्वप्न असून कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यात ही चळवळ पोहोचणे हेच या अभियानाचे उद्दिष्ट आहे. असे नमूद करून अशा प्रकाराची चळवळ अन्य उपनगरात राबविण्याचा निर्धार थुंकीमुक्त चळवळीचे प्रणेते आणि कार्यक्रमाचे आयोजक श्री राहूल चौधरी व महमदशरीफ काझी यांनी यावेळी व्यक्त केला.
या प्रसंगी डॉ. चैताली चौगले यांनी थुंकीमुक्त परिसराचे महत्व विषद केले. भागातील नागरिकांनी यावेळी प्रबोधनपर रॅलीचे आयोजन करून कोल्हापूर थुंकीमुक्त करण्याची शपथ घेतली. अभियानात डॉ.चैताली चौगुले, संपदा मुळेकर, लखन काझी, निवास भोसले, बाळासाहेब देसाई,चंद्रकांत कांडेकरी, संजय पोवार, गीतांजली डोंबे, नीता पडळकर, रसिका गोळे, सिद्धू जाधव, भरत तोडकर, रवी इनामदार, नागेश लाळगे, संदीप परीट, अमोल गुरव यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.