प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहरातील ‘थिबा पॉई&ट’ म्हणचे प्रसिद्ध राजमाता जिजामाता उद्यानाला नगर परिषदेतर्फे नुकताच रंगीबेरंगी साज चढविण्यात आला आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱया पर्यटकांचे खास आकर्षणात आणखीनच भर पडणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये नागरिकांना, पर्यटकांना सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी फिरण्यास बंधने घालण्यात आलेली होती. मात्र कोरानाचा प्रभाव कमी होताच ही बंधने हळूहळू दूर करण्यात आली. त्यामुळे बंद असलेली सार्वजनिक ठिकाणे खुली झाली आहेत. रत्नागिरीतील थिबापॅलेस येथील प्रसिध्द राजमाता जिजामाता उद्यान सुमारे 8 महिने बंद होते. त्यामुळे या उद्यानाचे नगर परिषदेमार्फत पुन्हा एकदा रंगरंगोटी करून रुपडे पालटण्यात आले आहे. उद्यानाच्या गेटपासून ते आतील सर्वच भाग आकर्षक रंगांत रंगविण्यात आला आहे. उद्यानाचे रुपडे पालटल्यानंतर हे उद्यान आता प्रदिर्घ कालावधीनंतर पर्यटकांसाठी सुरू झालेले आहे.









