
थायलंडमध्ये 100 दिवसांपासून देशांतर्गत संसर्गाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. म्यानमारच्या सीमेवरील सुरक्ष्वाढविण्यात आली आहे. शेजारी देशामधील बाधित पोहोचू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. थायलंडची संसर्ग रोखण्याची कामगिरी लक्षवेधी असल्याचे उद्गार
अमेरिका स्वबळावर

जागतिक आरोग्य संघटनेसोबत मिळून कोरोनावरील लस तयार व्हाइट हाउसने यासंबंधीची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेवर चीनशी संगनमत करून कोरोनाशी संबंधित माहिती लपविण्याचा आरोप अमेरिकेने केला होता. पंतप्रधान ओचा यांनी काढले आहेत.
पोप फ्रान्सिस दृष्टीस

ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस 6 महिन्यांमध्ये पहिल्यांदाच व्हॅटिकन सिटीच्या अपोस्टोलिक पॅलेसमध्ये समोर आले आहेत. त्यांनी एक दिवसापूर्वीच लेबनॉनमध्ये मारले गेलेल्या लोकांसाठी प्रार्थना आणि उपवास करण्याची घोषणा केली होती. टाळेबंदी लागू केल्यावर ते पहिल्यांदाच सार्वजनिक स्वरुपात दिसून आले आहेत.
व्हिक्टोरियात संसर्ग वेगवान

ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया आणि न्यू साउथ वेल्समध्ये रुग्णसंख्या वाढत चालली आहे. व्हिक्टोरिया प्रांतात दिवसभरात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही प्रांतांमध्ये संसर्गाची दुसरी लाट आली आहे. व्हिक्टोरिया प्रांतात 113 नवे रुग्ण सापडले आहेत. कोणत्या भागांमध्ये संसर्ग वेगाने फैलावला आहे हे शोधण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे.
इटली : माजी पंतप्रधानांना लागण

इटलीचे माजी पंतप्रधान सिल्वियो बर्लुस्कोनी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. माझा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःला आयसोलेट केले आहे. अत्यंत थकवा जाणवत असल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे. बर्लुस्कोनी हे इटलीतील सर्वात मोठय़ा माध्यम कंपनीचे मालक देखील आहेत. तसेच ते एसी मिलानचे मालक राहिले आहेत.








