कास्य धातूची सर्वात उंच गणेश मूर्ती ः फ्ररा फिकानेत अर्थात विघ्नहर्ता आणि यशोदेवता म्हणून होते पूजन
वृत्तसंस्था चाचेएंगसाओ (थायलंड)
गणेशभक्तांची मांदियाळी महाराष्ट्र आणि भारताच नव्हेतर परदेशातही आहे. भारताजवळील अनेक देशांमध्ये गणेशाची आराधना केली जाते. यामध्ये थायलंडचाही समावेश आहे. थायलंडमधील चाचोएंगसाओ या शहरालाच
सीटी ऑफ गणेशा’ म्हणूनच ओळखले जाते. या ठिकाणी असलेली कास्य गणेशमूर्ती सर्वात उंच असून दर्शनासाठी देशोदेशीचे भक्तगण येत असतात.
थायलंडमध्ये गणेशाच्या अनेक अनोख्या मूर्ती आहेत. फ्रांग अकात येथे गणेशाची 49 मीटर उंच मूर्ती आहे, तर जगातील सर्वात उंच 39 मीटरची कांस्याची मूर्ती गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये आहे. हे शहर बँकॉकपासून 80 किमी अंतरावर आहे. म्हणूनच ते पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. थायलंडमध्ये गणेश फ्ररा फिकानेत' म्हणून पुजले जातात. त्यांना विघ्नहर्ता व यशाचे दैवत मानले जाते. नवीन व्यवसाय व सणानिमित्त त्यांची पूजा केली जाते. थम्मासेट विद्यापीठातील सोमचाई जारन सांगतात, गणेश आमच्या संस्कृतीचा भाग आहे. लोक गणपतीची प्रतिमा कार्यालय व दिवाणखान्यात लावतात. जेव्हा ते भारतात अलिगड मुस्लिम विद्यापीठात शिकायला आले तेव्हा राम, विष्णू व भगवान गणेश यांच्याबाबत त्यांची आस्था आणखी वाढली. ते सांगतात, सामन रतनाराम मंदिरातील बाप्पाची आराम करणाऱया मुद्रेतील सर्वात मोठी मूर्ती आहे. दर्शनासाठी 20 हून अधिक देशांतील नागरिक येतात. थायलंड बौद्धबहुल लोकसंख्येचा देश. मात्र, लोक मोठÎा प्रमाणात गणेशचतुर्थी साजरी करतात. संस्कृतीवर गणपतीचा इतका प्रभाव आहे की, थायलंडच्या ललित कला विभागाच्या लोगोतही श्रीगणेश आहे. 2016 पर्यंत 60 वर्षे सत्तेत असलेले राजा राम (नववे) भारतीय संस्कृतीला मानणारे होते. त्यांच्या कार्यकाळात विष्णू, शिव यांच्यासोबत श्रीगणेशातील आस्था वाढली.
गणेश इंटरनॅशनल सेंटरही तेव्हाच झाले.
गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये बाप्पाची 32 रुपे
गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये गणपतीच्या 32 रुपातील मूर्ती आहेत. सर्वात उंच मूर्ती बाल गणेशाची आहे, ज्यांच्या एका हातात फणस, दुसऱयात केळी, तिसऱयात ऊस तर चौथ्यात आंबा आहे. हे पृथ्वीच्या सुपीकतेचे प्रतीक आहेत. मस्तकावर कमळाचे फूल आणि त्याच्या मध्यभागी
ओम’ आहे. ही मूर्ती कांस्याचे 854 भाग एकत्र करून बनवली आहे. फ्रांग अकात मंदिरात श्री गणेश आशीर्वाद देताना दिसतात. समन वत्तानरम मंदिरात श्रीगणेशाची 16 मीटर उंच आणि 22 मीटर लांब मूर्ती आहे.