सौंदत्ती पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
रात्रीच्यावेळी रस्त्याशेजारी उभ्या करण्यात आलेल्या ट्रकमधून डिझेल चोरणाऱया जोडगोळीला सौंदत्ती पोलिसांनी अटक केली आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांनी ही माहिती दिली आहे.
14 एप्रिल 2022 रोजी मल्लिकार्जुन फकिराप्पा कगदाळ (रा. यड्रावी, ता. सौंदत्ती) यांनी सौंदत्ती-धारवाड बायपास रस्त्यावर आपली ट्रक उभी करून ट्रकमध्ये झोपले होते. त्यावेळी डिझेल टँकमधून 400 लीटर डिझेल चोरण्यात आले होते. यासंबंधी सौंदत्ती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता.
रामदुर्गचे पोलीस उपअधीक्षक रामनगौडा हट्टी व सौंदत्तीचे पोलीस निरीक्षक करुणेशगौडा जे. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवानंद गुडगनट्टी व त्यांच्या सहकाऱयांनी बुधवारी पहाटे डिझेल चोरीप्रकरणी दोघा जणांना अटक केली आहे. चोरीसाठी वापरण्यात आलेली कार, डिझेल कॅन, पाईप,
6 हजार रुपये रोख रक्कम असा 1 लाख 26 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.









