बेळगाव गारठतेय, सुगीला उपयुक्त वातावरण
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर आणि उपनगरात थंडीने आपला जोर सुरू केला आहे. आता वातावरण बदलत असून थंडीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना उबदार कपडे परिधान करावे लागत आहेत. बेळगावात तालुक्मयात थंडी वाढली असून पारा आता कमाल तापमान 28.08 तर किमान तपमान 13 अंशावर येवून ठेपले आहे. थंडीत वाढ होत आहे. अशातच मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम पिकांवर काही प्रमाणात झाला. सध्या बेळगावचा पारा घटत असून यावषी अधिक प्रमाणात थंडी पडणार असे हवामान खात्याने वर्तविले आहे. तर काही तज्ञांनी यावषी हिवाळय़ात कोरोनाचे प्रमाण वाढण्याची शक्मयता वर्तविलीत आहे.
कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पावसाने जेरीस आणले होते. मात्र आता पावसाळी वातावरण जावून थंडी पडू लागली आहे. मागील चार दिवसांपासून बोचऱया थंडीला सुरुवात झाली होती. तर मंगळवारी बेळगावचा पारा 13 अंशावर घसरला आहे. यावषी पावसाने उसंतच घेतली नाही. पाऊस कधी जाणार आणि थंडी कधी पडणार याकडे साऱयांचे लक्ष लागले होते. ऑक्टोबर गरमीचे तापमान ओसरल्यानंतर एकदम गारवा निर्माण होतो. यामुळे नागरिकांच्या आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगतात. यासाठी आपण दक्षता घेणे गरजेचे आहे.
सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण उबदार कपडे खरेदी करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत स्वेटर, कानटोप्या, हातमोजे खरेदी करण्याकडे ओढा लागल्याने दुकानांमध्ये गर्दी दिसू लागली आहे. दिवाळी सणासाठी खदी करण्यासाठी आलेले नागरिक गरम कपडेही खरेदी करताना दिसत आहेत.









