मध्यंतरी समाज माध्यमात पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर आता कुत्रे आणि मांजरांनाही कोरोनाची लागण होत असल्याची माहिती मिळत आहे. पाळीव प्राण्यांपासून माणसांना कोरोनाची लागण होत असल्याचा कोणताही पुरावा उघडकीस आला नाही. पण एका प्राण्यामुळे दुसऱया प्राण्याला संसर्ग होऊ शकतो, असे समोर आले आहे. मात्र कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी प्राण्यांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित झाल्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाण कमी आहे. कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीचे व्हेटर्नरी मेडिसीन आणि बायोमेडिकल सायन्सेस कॉलेजमधील संशोधकांसोबत अँजेला एम. बॉस्को-लूथ, एरिन ई. हार्टविग आणि स्टेफनी एम. पोर्टर यांनी यासंबंधीचे संशोधन केले आहे.
न्यूझीलंडने अशी केली कोरोनावर मात!

न्यूझीलंड हा 50 लाख लोकसंख्या असलेला देश आहे. 24 सप्टेंबरपासून एकही नवीन बाधित रुग्ण आढळला नाही. दक्षिण पॅसिफिकच्या भागात असलेल्या न्यूझीलंडला इतर देशात कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात कसा पसरला याचा अभ्यास करण्यास वेळ मिळाला. तसेच कोरोनाला अटकाव करण्यासाठी पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांनी तातडीने पावले उचलत उपाययोजना केली. तसेच कोरोनाचा पहिला रुग्ण आढळताच अनेक कठोर पावले उचलण्यात आली. विदेशातून मायदेशी येणाऱया लोकांपासूनही कोरोना पसरू शकतो ही बाबत लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. एकंदरीतच वैज्ञानिक दृष्टीकोन, योग्य उपाययोजना आणि चांगल्या राजकीय नेतृत्वामुळे कोरोनावर मात करणे शक्मय झाल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
न्यूझीलंडने कोरोनावर मात केली असून आता तेथे एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याची माहिती आरोग्य अधिकाऱयांनी दिली आहे. कोरोनामुक्तीनंतर देशात यशाचे सेलिब्रेशन करण्यात आले. देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा सामुहिक प्रयत्न करून कोरोनाच्या संसर्गावर मात केली असून ही आमच्यासाठी मोठी बाब आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे.









