प्रथमश्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावणारा पहिला फलंदाज, द्विशतकवीर बाबुलसह 538 धावांची भागीदारी
कोलकाता (प. बंगाल) / वृत्तसंस्था
बिहारच्या सकिबूल गणीने प्रथमश्रेणी पदार्पणात त्रिशतक झळकावत शुक्रवारी नवा इतिहास रचला. येथील जादवपूर विद्यापीठ कॅम्पसच्या सेकंड ग्राऊंडवर मिझोरमविरुद्ध सुरु असलेल्या रणजी चषक प्लेट गटातील लढतीत गणीने 405 चेंडूत 341 धावांची आतषबाजी केली. त्याच्या या विक्रमी खेळीत तब्बल 56 चौकार व 2 षटकारांचा समावेश राहिला. या डावादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 84.20 इतका राहिला.
यापूर्वी, गुरुवारी पहिल्या फेरीतील पहिल्या दिवशी मुंबईतर्फे अजिंक्य रहाणेने सौराष्ट्रविरुद्ध तर दिल्लीच्या यश धुलने तामिळनाडूविरुद्ध शानदार शतके झळकावली होती. त्यानंतर शुक्रवारी दुसऱया दिवशी गणीने इतिहास रचणारे त्रिशतक झळकावले. गणीला द्विशतकवीर बाबुलची उत्तम साथ लाभली. त्याने 398 चेंडूंचा सामना करत 27 चौकार व 1 षटकारासह नाबाद 229 धावा फटकावल्या. बाबुल कुमार व गणी यांनी 538 धावांची भागीदारी साकारली, हा देखील आणखी एक विक्रम ठरला.
संक्षिप्त धावफलक
बिहार पहिला डाव ः 5 बाद 686 वर घोषित. (सकिबूल गणी 405 चेंडूत 56 चौकार, 2 षटकारांसह 341, बाबुल कुमार 398 चेंडूत 27 चौकार, 1 षटकारासह नाबाद 229, बिपीन सौरभ 39 चेंडूत नाबाद 50). मिझोराम पहिला डाव ः 18 षटकात 3 बाद 40 (जोसेफ 14, तरुवर कोहली नाबाद 11. अभिजीत सकेत 2-25, आशुतोष 1-1).
बॉक्स
पहिल्या फेरीतील अन्य लढतींवर दृष्टिक्षेप
बडोदा 181 व 5 बाद 144 वि. बंगाल 88
हैदराबाद 347 वि. चंदिगढ 6 बाद 200
दिल्ली 452 वि. तामिळनाडू 2 बाद 75
झारखंड 169 व 133 वि. छत्तीसगढ 174 व 2-62
सिक्कीम 302 वि. नागालँड 4 बाद 300
अरुणाचल प्रदेश 119 व 6 बाद 40 वि. मणिपूर 296
मेघालय 148 वि. केरळ 8 बाद 454
मध्य प्रदेश 274 वि. गुजरात 6 बाद 244
कर्नाटक 481 वि. रेल्वे 3 बाद 213
पुडुच्चेरी 343 वि. जम्मू व काश्मीर 3 बाद 260
मुंबई 7 बाद 544 घोषित वि. सौराष्ट्र बिनबाद 18
गोवा 181 व 2 बाद 87 वि. ओडिशा 189
राजस्थान 275 व 2 बाद 97 वि. आंध्र 224
सेनादल 176 व 1 बाद 29 वि. उत्तराखंड 248
हिमाचल प्रदेश 354 वि. पंजाब 4 बाद 393
हरियाणा 556 वि. त्रिपुरा 1 बाद 56
उत्तर प्रदेश 301 वि. विदर्भ 2 बाद 256 महाराष्ट्र 415 वि. आसाम 2 बाद 81









