ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
पुलवामाच्या अवंतीपुरा क्षेत्रातील चेवा उलर, त्रालमध्येकाही दहशतवादी लपल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुरुवारपासून जम्मू पोलीस, 42 आरआर आणि सीआरपीएफ कार्डन यांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन सुरु होते. दरम्यान, आज सकाळी सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबाराला सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले.
गुरुवारीही या कारवाईत त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि जम्मू पोलिसांना यश आले होते.









