प्रतिनिधी / सातारा
नगर विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 36 कर्मचाऱ्यांना सहावा, सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी आमदारांनी ही प्रयत्न केले होते. म्हणून सातारा पालिकेतील 36 कर्मचाऱ्यांच्या वतीने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सुरुची बंगला येथे जाऊन सत्कार करण्यात आला.
तब्बल अठरा वर्षापासून आस्थापनेवर येण्यासाठी झगडणाऱ्या छत्तीस कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षापासून रखडलेल्या सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाला आहे. आस्थापना विभागाने वेतन निश्चिती करून याच महिन्यात वाढीव वेतन देण्याचे संकेत दिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नगर विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 36 कर्मचाऱ्यांना सहावा, सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी मंत्रालयात याबाबत मिटींगही आयोजित केली होती. असे काही सदस्यांनी सांगितले.
Previous Articleगडहिंग्लजला महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांची निदर्शने
Next Article मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध गांधीगिरी









