प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर शहरातील हॉस्पिटल व कोविड सेंटरमधील रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ झाली असून त्याबाबत बीलांचे व उपचाराचे ऑडिट होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने प्रशासनाला सूचना देण्यात येतील, असे सांगतानाच ९० टक्क्याहून अधिक हॉस्पिटल, डॉक्टर्स झोकून देवून काम करीत आहेत. काही हॉस्पिटलमध्ये तक्रार आहे. त्यांचे ऑडिट करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. येथील तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, मर्यादेपेक्षा जादा बिलांची आकारणी केल्याबाबत एक दोन हॉस्पिटलच्या तक्रारी आल्या आहेत. त्यांचे ऑडीट होणे आवश्यक आहे. रुग्ण डिस्चार्ज होण्या अगोदर बिलांची तपासणी व्हावी, अशी मागणी फोन व मेसेजद्वारे झाली आहे. त्यावर लक्ष ठेवण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली आहे. कोणत्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण उपचारात किती, कोरोनामुक्त किती व मृत्यू किती याबाबत प्रशासनाला माहिती मिळणे गरजेचे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








