प्रतिनिधी / कुडाळ
जावली तालुक्यातील मारली घाटात खून करून मृतावस्थेत टाकलेल्या पती-पत्नीच्या प्रकरणाला खळबळजनक वळण लागले आहे. त्या दापत्त्यासह त्यांच्या दोन मुलांचा खून झाल्याचे सोमवारी उघड झाल्याचा अंदाज वर्तविला जात असून दापत्यानंतर एका मुलाचा ही काल सोमवारी दिनांक 31 रोजी घाटातून सांगाडा सापडला असल्याचा अंदाज वातरवला जात असून दुसऱ्या मुलाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आज सकाळी पुन्हा मृतदेहाचा तपास सुरू झाल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्स नि दुसर्या मुलाचा शोध घेतला, त्याच्या हाडाचा सापळा पोलिसांच्या ताब्यात दिला असून, या घाटात विशाल जाधव 26 व तुषार जाधव 20 असे हे दोन्ही सख्ख्या भावांचा मृत्यू देहाचे हाडांचे सांगाडे काल आणि आज सापडल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
दोन मुले जुलै महिन्यामध्ये ट्रेनिंगसाठी याच योगेश निकम यांच्याकडे आली होती. त्यामुळे त्या दोन मुलांचा ही घातपात झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन बॉडीचे सांगाडे सापडले आहेत. परंतु त्याचे आयडेंटिफिकेशन होणे अजून बाकी आहे. आमचा शोध सुरू आहे. त्यामुळे आयडेंटिफिकेशन झाल्यानंतरच आपल्याला कन्फर्म सांगता येईल ही बोडी त्याच मुलांची आहे का नाही. – एस पी तेजस्विनी सातपुते
Previous Articleबार्शीत अवतरले बाप्पा, राबवले विविध उपक्रम
Next Article ब्लॅक टॉप पोस्टवर भारताचा कब्जा









