परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त

प्रतिनिधी / बेळगाव
संत रोहिदासनगर येथे धोकादायक विद्युत खांब असल्याचे वृत्त तरुण भारतमधून प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर दुसऱयाच दिवशी या विद्युत खांबाची दुरुस्ती करण्यात आली. हा विद्युत खांब अत्यंत धोकादायक स्थितीत होता. कधी कोसळेल याची शाश्वती नव्हती. तेव्हा हा खांब हटवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून करण्यात आली होती. त्याची दखल हेस्कॉमने घेतल्यामुळे अनगोळ परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
संत रोहिदासनगर येथे विद्युत खांबाचे सिमेंट निघाले होते. त्यामधील लोखंडी सळय़ा बाहेर पडल्या होत्या. तो खांब अत्यंत धोकादायक बनला होता. हा परिसर नेहमीच वर्दळीचा आहे. अनगोळ, मजगाव, संत रोहिदासनगर या परिसरात वसती वाढली आहे. विद्यार्थीही या परिसरातूनच ये-जा करतात. तेव्हा तो खांब बदलावा, अशी मागणी करण्यात आली होती.
त्याची दखल हेस्कॉमने घेतली आणि तातडीने तो विद्युत खांब बदलून दुसऱया विद्युत खांबाची उभारणी केली. याबद्दल हेस्कॉम कर्मचाऱयांचे आभार मानण्यात आले आहेत.









