ऑनलाईन टीम / मुंबई
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमध्ये एका कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना विरोधी पक्षांवर निशाणा साधला होता. यावेळी बोलताना योगी यांनी “समाजवादी पार्टीचे सरकार गरिबांचे रेशन खाते व त्यांना मरू देते. अब्बा जान म्हणणाऱ्या एका समुदायास फायदा पोहोचवत होते. मात्र २०१७ च्या अगोदर गरिबांना रेशन का मिळत नव्हते ? कारण तेव्हा राज्य सरकार चालवणारे आणि माफिया गरिबांचे रेशन खात होते आणि लोक उपाशी मरत होते व त्यांचे रेशन नेपाळ आणि बांगलादेशपर्यंत पोहोचत होतं. आज गरिबाचं रेशन कुणीच नाही घेऊ शकत, घेतलं तर तुरूंगात नक्कीच जाईल. असे ही ते यावेळी म्हणाले होते.
याच कार्यक्रमातील अब्बा जान’ या वक्तव्यावरुन बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी योगी आदित्यनाथांना फटकारलं आहे. योगी आदित्यनाथ यांचं हे वक्तव्य आक्षेपार्ह असल्याचं सांगत शहा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. “उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचं ‘अब्बा जान’चं वक्तव्य अपमानास्पद असून त्यावर प्रतिक्रिया देण्यासारखं देखील नाही,” असं नसीरुद्दीन शाह म्हणाले आहेत.








