प्रतिनिधी / जयसिंगपूर
जयसिंगपूर येथील दहाव्या गल्लीतील 73 वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह. बुधवारी रात्री पासून येथील सहाव्या गल्लीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर रुग्णास सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस स्थानका मागील दहाव्या गल्लीतील हा रुग्ण असून सध्या व्हेंटिलेटरवर आहे, असे समजते.
त्याच्या घरातील सात ते आठ व्यक्ती व जयसिंगपूर शहरातील रुग्णालयातील आलेला संपर्क कितीजणांचा याची माहिती आरोग्य विभाग घेत आहे. दहावी गल्ली प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित होण्याची शक्यता आहे. खासगी रुग्णालयातील तपासणी पॉझिटिव्ह आलेली असली तरी शासकीय रुग्णालयातील तपासणी अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








