प्रतिनिधी / संगमेश्वर
लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. रोजगारासाठी धडपडत असलेल्यांना एकत्रित करीत वेगवेगळे गृह उद्योग सुरु करून नावडी पंचायत समिती सदस्य वेदांती पाटणे यांनी रोजगार मिळवून दिला आहे.
लॉकडाऊनमुळे मुंबईहून आलेले अनेक जण मुंबईतील नोकरी सुटल्याने आपल्या गावी अडकले आहेत होते. ज्यांच्यावर घर अवलंबून होते. असे अनेक जण चिंतित होते. अश्या युवक महिला पुरुष युवतींना एकत्रित करून विविध ग्रह उद्योग सुरू करून त्यांना रोजगार मिळवून देण्याचे काम पाटणे यांनी केले.
लांजा येथील प्रतिभा एंटर प्रायझेसचे योगेश सावंत यांच्या सहकार्याने गृहउद्योग सुरू करण्यात आले आहे. हॅडमेड मेणबत्ती तयार करून त्यांचे मार्केटिंग करणे यांसह अनेक छोटे उद्योग सुरू करण्यात आले. गजानन लिंगायत अविनाश लिंगायत कवितामुळे राजू चव्हाण नारायण चव्हाण यांच्यासह अनेकांना अशा उद्योग यशस्वीपणे सुरू केला आहे. यासाठी अतिश पाटणे यांचेदेखील महत्वाचे सहकार्य लाभले आहे.









