टिळकवाडी पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
मुळचा संतीबस्तवाड व सध्या रामनगर, कंग्राळी खुर्द येथे राहणाऱया एका युवकाकडून आणखी सात मोटार सायकली टिळकवाडी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या युवकाकडून जप्त केलेल्या वाहनांची संख्या 14 वर पोहोचली आहे.
दीपक देमाणी लोहार (वय 22, मुळचा रा. लक्ष्मी गल्ली, संतीबस्तवाड, सध्या रा. रामनगर, कंग्राळी खुर्द) असे त्याचे नाव आहे. 9 डिसेंबर 2020 रोजी दीपकला अटक करुन 7 चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या होत्या. त्याला पोलीस कोठडीत घेवून त्याने चोरलेल्या आणखी सात मोटार सायकली गुरूवारी पोलिसांनी जप्त केली आहे.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, गुन्हे तपास विभागाचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, पोलीस उपनिरीक्षक एम. वाय. कारीमनी, पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी, हवालदार के. के. सवदत्ती, सैय्यद गुडारद, एस. एम. कळ्ळीमनी, एस. ए. सावकार, मल्लिकार्जुन पात्रोट, मारुती मरनिंगगोळ, टी. जी. सुळकोड आदींनी ही कारवाई केली आहे.
19 नोव्हेंबर रोजी स्वामी विवेकानंद कॉलनी येथून केए 22 एचई 5884 क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाली होती. या प्रकरणी 21 नोव्हेंबर रोजी मोनेश तिळवी (रा. देवराज अर्स कॉलनी, बसवणकुडची) यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दीपक लोहार या तरुणाला अटक करुन त्याची कसून चौकशी केली असता त्याने बेळगाव शहर व उपनगरांत अनेक ठिकाणी दुचाकी चोरल्याची कबुली दिली होती. त्याच्या जवळून एकूण 14 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.









