सातारा / प्रतिनिधी :
गुरुवारी सातारा शहरात काही तरुणांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाबाहेर तोडफोड केली असावी, शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर शेणी पेटवल्या असाव्यात. तो त्यांनी राग व्यक्त केला आहे. तो राग योग्य आहे. परंतु त्या युवकांच्या कुटूंबियांना धमकी देणे आमदार शशिकांत शिंदे यांना न शोभणारे आहे. ‘त्या’ युवकांच्या केसालाही धक्का लागता कामा नये असा इशारा माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिला.
येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेंद्र पाटील बोलत होते. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनातर महाराष्ट्रमध्ये मराठा समाजामध्ये खूप वाईट प्रतिक्रिया निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रात काही जिल्ह्यात केस मुंडण तर काही ठिकाणी रस्ता रोको करण्यात आले. सातारमध्ये काही तरुणांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर जाऊन तोड फोड केलेली असावी, किंवा शंभूराज देसाई यांच्या घराच्या समोर शेणी पेटवल्या असाव्यात, तो मराठा समाजातील बांधवांनी राग व्यक्त केलेला आहे. तो राग योग्य आहे. यदा कदाचित त्यांनी असं आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरासमोर शांतपणे आंदोलन केले असते तरी चालले असते. हे आंदोलन कायदेशीर मार्गाने केले असते तर बरे झाले असते.
परंतु, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्या युवकाच्या घरच्यांशी जाऊन दादागिरीची भाषा केलेली आहे. ही भाषा त्यांना शोभत नव्हती हे न पटण्यासारखे आहे. ते युवक कोणत्या पक्षाचे नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी केलेले नाही.ते उत्स्फूर्तपणे करत आहेत आणि जर अशा लोकांना त्रास होत असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक सत्ताधारी आमदारांनी काळजी करणं गरजेच आहे. कारण मराठा पेटलेला आहे. मराठा तरुणांच्या भावनेला आता ठेच पोहचवली आहे. तुम्हाला आरक्षणाची गरज नाही. तुमच्या चार चार पिढ्या बसुन खाऊ शकतात. तुमचे कारखाने आहेत, तुमचे उद्योग आहेत, पतपेढ्या आहेत. पण जो शेतकरी मराठा आहे त्याच अस्तित्व कुठे तरी आरक्षणामुळे येणार होतं. मात्र तुमच्या लोकांच्या चुकीच्या युक्तीवादामुळे ते अडचणीत आले आहे. त्या तरुणांनी राग व्यक्त केला तो योग्य आहे. सातारा पोलिसांनी याची चौकशी करावी, व्हिडीओ तपासावे, ज्या व्हिडीओमध्ये त्या युवकांच्या परिवाराला धमकी दिली आहे त्याची तपासणी करावी यदा कदाचित त्या मुलांच्या केसाला धक्का लागला तर मराठा समाज हा कोणाला ही सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.
आमदार शिंदे मराठा आहेत की नाही?
एका प्रश्नी उत्तर देताना नरेंद्र पाटील म्हणाले, शशिकांत शिंदे हे मराठा आहेत की नाहीत हे त्यांनाच माहिती. काल त्यांच्या बोलण्यावरून मराठी मराठी शब्द येत असेल. त्यांचा पक्ष मराठी शब्द वापरतो. काल अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषद झाली तेव्हा ते मराठा माणूस म्हणून बोलू शकत होते पण नाही बोलले. नवाब मलिक हे मुस्लिम आहेत त्यांना मराठ्यांच्या बद्दल काय माहिती आहे. त्यांचं त्यांना दुःख काय माहिती तेव्हा त्यांनी बोलायला पाहिजे होते.ते बोलले नाहीत, अशी टिप्पणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर करत सातारच्या मुलांच्या केसाला धक्का लागता कामा नये, असे त्यांनी बजावले.