सावंतवाडी / प्रतिनिधी:
सावंतवाडी येथील एका खाजगी बँकेतील असिस्टंट अधिकारी यांच्या गूढरित्या बेपत्ता प्रकरणामागे दोन तरुणांचा एका तरुणीचा सहभाग आहे. या तिघांना चौकशीसाठी ताब्यात घ्या अनेक बाबी उघड होतील. अशा मागणीचे निवेदन कारिवडे भैरवाडी येथील प्रगती महिला बचत गटाच्या महिलांनी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना दिले आहे. ह्या नंतर तात्काळ पोलीस यांनी या तिघांचा शोध घेण्यासाठी पथके तैनात केली आहेत. यावेळी जि. प. शिक्षण विभागाचे माजी सभापती मंगेश तळवणेकर, व बेपत्ता बँक कर्मचाऱ्याची मनोहर गावडे यांची पत्नी, सरपंच अपर्णा तळवणेकर आदी उपस्थित होते.









