प्रतिनिधी/ बेळगाव
महिलेला दगड मारून गंभीर जखमी करूनही शहापूर पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी त्या महिलेची फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. मराठीतून फिर्याद दिल्यामुळे तुम्ही केवळ तो अर्ज दिला आहे, असे म्हणून त्यांची फिर्याद घेतली नाही. वकीलही पोलीस स्थानकात गेले असता त्यांच्याशीही उद्धट उत्तरे पोलीस निरीक्षकांनी दिली आहेत. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्या महिलेने आणि वकिलांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शास्त्राrनगर येथील नीता बाळू पाटील यांना मारहाण करण्यात आली. तिच्या डोक्मयात दगडाने घाव घालण्यात आला. यामध्ये नीता गंभीर जखमी झाल्या. त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन मराठीतून मारहाण करणाऱयांच्या विरोधात फिर्याद दिली. मात्र तुम्ही हा अर्ज लिहून दिला आहे. त्यामुळे चौकशी करतो, असे सांगून संशयित आरोपींवर गुन्हाच नोंदविला नाही. त्या महिलेवर अन्याय झाल्यानंतर ऍड. प्रवीण करोशी पोलीस स्थानकात गेले. त्यांच्याशीही उद्धट उत्तरे उपनिरीक्षकांनी दिली आहेत.
गरीब जनतेला न्याय मिळत नसेल तर पोलीस स्थानकाची गरज काय? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांची चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी ऍड. राम घोरपडे, ऍड. एस. बी. देसाई, ऍड. बी. पी. कोटगी आदी उपस्थित होते.









