तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरातील एक व्यक्ती ग्वाल्हेरला गेल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळला असल्याचे ग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने दुपारी तपासणी केल्यानंतर त्यापरिसरातील गावात 542 कुटुंब असून त्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी पंधरा जणांची टीम नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर बुधवारी यांनी दिली. सदर रुग्ण सोलापुरात नसून ग्वाल्हेरच्या मेडिकल कॉलेज मध्ये ऍडमिट असल्याचे शंभरकर यांनी सांगितले.
दरम्यान, या सर्वांची तपासणी केल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी पुढील कारवाई करण्यात येईल . दरम्यान त्या गावातील परिसरात 542 कुटुंब आहेत. या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी पंधरा जणांची टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवार पर्यंत पूर्ण सर्वेक्षण करून त्या व्यक्तींची तपासणी होणार आहे. संध्याकाळी यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल असेही शंभरकर यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









