मुंबई/प्रतिनिधी
नवाब मालिकांच्या वक्तव्यामुळे क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी (rave drugs part) प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. दरम्यान, क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे शाहरुख खानला मोठा धक्का बसला आहे. मात्र आर्यनच्या जामिनावर पुढील सुनावणी आज (शुक्रवार 8 ऑक्टोबर) होणार आहे. दरम्यान, या क्रूझवर झालेल्या ड्रग्स पार्टीत भाजपच्या एका नेत्याचा मेव्हणाही होता. तो कोण होता त्याची मी उद्या पोलखोल करणार आहेच, असं सांगतानाच भाजप नेत्याच्या मेव्हण्याला एनसीबीने का सोडले?; असा सवाल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (minister nawab malik) यांनी केला आहे. मलिक उद्या एनसीबीच्या रेडवरून अनेक गौप्यस्फोट करणार असल्याने त्यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
नवाब मलिक यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एनसीबीला हा सवाल केला आहे. क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असेही ते म्हणाले. नवाब मालिकांनी माध्यमांशी बोलताना उद्या भाजपचा कोण नेता आहे त्याचं नाव उद्या घोषित करणार असल्याचे सांगतानाच NCB चे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांनी मीडियाला बाईट देताना 8 ते 10 लोकांना पकडले आहे असे मीडिया बाईटमध्ये सांगितले होते. खरे तर या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारा एक अधिकारी अंदाजे उत्तर कसे काय देऊ शकतो, असा सवालही त्यांनी केला आहे.