ऑनलाईन टीम / इस्लामिया :
इजिप्तच्या सुएझ कालव्यात अडकलेल्या महाकाय मालवाहू जहाजामुळे इतर 156 जहाजांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे इजिप्तला ताशी 2800 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. कारण इजिप्तला टोल टॅक्सच्या रुपाने दररोज 67,200 कोटी रुपये मिळतात.
जगातील व्यापारात महत्वाची भूमिका बजावणाऱया सुएझ कालव्यात 23 मार्चला एव्हरग्रीन नावाचे महाकाय मालवाहू जहाज अडकले आहे. या जहाजामुळे इतर जहाजांचा प्रवास थांबला आहे. चीनहून नेदरलँडला जाणारे हे जहाज 400 मीटर लांबीचे असून, जहाजात जवळपास 20 हजार कंटेनर आहेत. या जहाजाची उंची दहा मजली इमारतीपेक्षा उंच आहे. मागील तीन दिवसांपासून हे जहाज तिथेच अडकून आहे. जहाजातील माल कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी सात दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे सुएझ कालवा ऍथॉरिटीचे म्हणणे आहे.









