त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला रिपोर्ट मारण्याची मोहीम
प्रतिनिधी / सातारा
सातारा शहरातील एक छायाचित्रकारांकडून आउट डोअर वेडिंग फोटोग्राफीच्या नावाखाली गडकिल्ले परिसरात जाऊन मॉडेलचे अंगविक्षेप असलेले फोटो काढले जातात. त्याने यापूर्वी गडकिल्यावर फोटोग्राफीची कार्यशाळा घेतली होती. सातारा शहरातील व जिल्ह्यातील शिवभक्तांच्या ही बाब निदर्शनास येताच सोशल मीडियावर जोरदार निषेध व्यक्त करत त्याच्या इन्स्टाग्रामवर रिपोर्ट मारण्याचे आंदोलन सुरू आहे.
ज्या ऐतिहासिक ठिकाणे, गटकोट जुन्या वास्तूच्या ठिकाण ही शिवभक्तांसाठी प्रेरणादायी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ही अनेक किल्ले उभे केले. ते किल्ले आजच्या पिढीला दिशा देण्याचे काम करतात. त्याच गडकिल्यावर व ऐतिहासिक ठिकाणी साताऱ्यातल्या व सातारच्या बाहेरच्या मॉडेलचे अंग विक्षेप हावभावातले फोटो काढले जातात. तसेच काही फोटो तर कपल फोटो काढले गेल्याची बाब शिवभक्तांच्या निदर्शनास येताच त्या छायाचित्रकाराचा तीव्र निषेध सोशल मीडियावर सुरू झाला आहे. त्या फोटोग्राफरचे इन्स्टाग्राम अकाउंट रिपोर्ट मारून शिवभक्तांकडून निषेध नोंदवला जात आहे. काही शिवभक्तांनी तर फोन करून तर काहींनी मेसेज करून ऐतिहासिक ठिकाणी तसले फोटो काढू नका अशी विनंती केली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









