प्रतिनिधी / शिरोळ
शिरोळ तालुक्यातील 33 ग्रामपंचायतीच्या प्रशासक नियुक्तीचा काहीं अधिकाऱ्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी नियुक्ती रद्द करण्याचा आदेश प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे प्रशासक नियुक्तीचा खेळ अखेरच्या क्षणापर्यंत सुरूच होता.
शिरोळ तालुक्यातील आलास, गौरवाड, गणेश वाडी ,जैनापुर, तमदलगे, निमशिरगाव, शिरटी , शेडशाळ, उदगाव, घोसरवाड, जुने दानवाड ,तेरवाड, नरसिंहवाडी ,नांदणी ,बस्तवाड, मजरेवाडी, शिरदवाड, अर्जुनवाड, कोंडिग्रे,कोथळी, कुटवाड , कवठेगुलंद, घालवाड, चिपरी, दानोळी, हसुर ,जांभळी ,टाकळीवाडी, दत्तवाड, धरणगुत्ती, यड्राव व शिरढोण या तयत्तीस ग्रामपंचायतीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आहे.
नुकतेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमल मित्तल यांच्या स्वाक्षरीने या 33 ग्रामपंचायतीवर विविध विभागातील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली तसे आदेशही देण्यात आले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली ते अधिकारी गावचा कारभार करण्याची संधी मिळाल्याच्या आनंदात होते. त्यातील नांदणी, कोथळी, शिरटी, हसूर व निमशिरगाव. या गावातील प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना पदभार स्वीकारण्यापूर्वी नियुक्ती रद्द केल्याचे आदेश प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे
यामध्ये प्रामुख्याने शिरटी , हसुर नांदणी, कोथळी,निमशिरगाव या ग्रामपंचायतीच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केली त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे सुरुवातीपासून प्रशासक नियुक्तीचा राजकीय हस्तक्षेपामुळे विलंब होत होता सध्या एकेका अधिकाऱ्याकडे तीनं तीन गावे प्रशासक म्हणून देण्यात आली आहेत अखेरच्या क्षणापर्यंत प्रशासक नियुक्तीचा घोळ सुरू होता>
दरम्यान पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शंकर कवितके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की वरिष्ठांच्या आदेशानुसार काही गावातील प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासक म्हणून नियुक्ती झालेल्या काही कर्तबगार महिलांच्या नियुक्ती नव्या आदेशाने रद्द केल्याने नैराश्याचे वातावरण पसरले आहे. तर एका एका अधिकाऱ्याला दोन ते तीन ग्रामपंचायतीचा प्रशासक पदाचा पदभार दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









