ऑनलाईन टीम
केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी विधेयकाविरोधात गेली अनेक महिने शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदोलन करीत आहेत. यावर अद्याप तोडगा निघाला नाही. शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम असून सरकारच्यावतीने हे विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सीमा रेषेवरील हे आंदोलन आता जंतर मंतरवर सुरु केले आहे. विरोधकांनी देखील संसदेत हे विधेयक मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी १४ भाजपा विरोधी पक्षाचे नेते आज, जंतरमंतरवर पोहोचले होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. तर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, डीएमके, आरजेडीसह डाव्या पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी शेतकरी वाचवा, भारत वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी “आम्ही आज शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी येथे आलो असल्याचे सांगितले. तर, शेतकरी विरोधी असलेले हे काळे कायदे सरकारला रद्द करावे लागतील. त्यानंतरच हे आंदोलन संपेल.”, असंही सांगितलं. तसेच प्रत्येक भारतीयाच्या मोबाईलमध्ये मोदी घुसले आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
Previous Articleमटका प्रकरणी तिघांवर गुन्हा
Next Article वसुली अभावी पालिकेच्या योजनांना फटका









