प्रतिनिधी / शिरोळ
महापुराने ज्यांच्या घरात पुराचे पाणी गेले आहे अशा पूरग्रस्तांनाच शासनाची मदत दिली जाणार आहे. पूरग्रस्त गावात पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. पंचनाम्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या त्या गावात लाभाच्या नावांची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी दिली. शासनाच्या या जाचक अटीमुळे अनेक पूरग्रस्त लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
शिरोळ तालुक्यातील चाळीसहुन अधिक गावांना महापुराचा फटका बसला आहे. अद्याप काही गावामध्ये पुराचे पाणी आहे. प्रशासनाने तातडीने हालचाली करुन नागरिकांना स्थलांतरित करण्याचे आवाहन केले होते. त्यास नागरीकानी प्रतिसाद देऊन स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शिरोळ तालुक्यातील 80 हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. तसेच तीस हजारांहून अधिक जनावरांचे ही स्थलांतर करण्यात आले होते. या महापुरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. स्थलांतरित झालेल्या सर्वच नागरिकांना मदत मिळावी अशी मागणी होत आहे. तसेच पूर्व सरल्यानंतर तातडीने शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांनाही भरीत भरीव मदत मिळावी व प्रामाणिक शेतकऱ्यांना 50 हजार रुपये जाहीर केलेले अनुदान त्वरित देण्याची मागणी होत आहे.
Previous Articleमोस्ट वाँटेड गँगस्टर काला जेठडी दिल्ली स्पेशल सेलच्या जाळ्यात
Next Article जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्डयांवर छापे









